त्यापेक्षा पिलेलं बरं… – by Pravin Javheri

माझ्या मते प्रेमात पडलेल्या मुलांच्या दोन जाती असतात. पहिली म्हणजे ज्यांना खरं प्रेम लाभलंय ती जात! ह्यात त्याला तर ती आवडतेच, पण तिलाही तो आवडतो!!… खरंवालं खरं प्रेम! ह्या जातीची लोकसंख्या तशी कमीच आहे. दुसरी जात म्हणजे माझ्यासारख्यांची. सगळं try करून भागलेली, पण काहीच नशिबी नसलेली. त्यामुळे आमच्यासारख्यांच्या कवितांमध्ये ‘प्रेयसीच्या गालावरल्या खळीपासून – दारूच्या मळीपर्यंतचा’ प्रवास दिसतो.

मी ह्या जातीला एक नाव दिलंय. LBC… Lovers Backward Class! असं असलं तरी, LBC ला कुठल्याही सुंदरीच्या ह्रदयात आरक्षण नाही ती गोष्ट वेगळी!

(खरंतर एक तिसरीही जात असते. ‘हा माझा experience नाही, मित्रांच्या अनुभवावरून लिहिले आहे’ म्हणणारी. पण ह्या सगळ्या निव्वळ अंधश्रद्धा असतात. मनात ह्यांच्याही असतेच एखादी crush, पण उगाच चारचौघात सांगायला लाजतात, म्हणून हा परानूभवाचा बहाणा.)

तर असा मी LBC जातीचा कवी माझी व्यथा मांडतोय.

‘फु बाई फु’च्या कुठल्याशा Grand Finale मधे दोन ओळी ऐकल्या होत्या, तेव्हा ही कविता सुचली. तर असा मी LBC जातीचा कवी माझी व्यथा मांडतोय.

 

त्यापेक्षा पिलेलं बरं…

 

दारू पिण्यापेक्षा मेलेलं बरं…

पण मरणाची भीती वाटते, त्यापेक्षा पिलेलं बरं!

 

कॉलेजमधे होतो तेव्हा तिच्यासोबत १०० प्लान्स्‌ बनायचे

पण त्यातल्या एखाद्याच्याच नशिबी होते सक्सेसफूल व्हायचे

उरले ९९…

ते उरलेले ९९ पूर्ण करायला मी मित्रांसोबत हॉस्टेलवरंच बसायचो

वॉर्डन कधी ओरडला नाही, कारण त्याला रसना म्हणून पाजायचो

एक प्रश्न पडायचा…

माझं तर ठीक आहे – मी ह्या ९९ वेळी मित्रांसोबत बसतो

पण त्यावेळी हीचा नेमका पत्ता कुठे असतो?

कुठूनतरी कळलं जेव्हा की,

असेच १०० प्लान्स्‌ हिचे इतर १०० ठिकाणी बनतात

आणि मग उरलेले नाईंटी नाईन कुठेतरी नाईंटी मारत बसतात

म्हणून वाटायचं,

अशी गर्लफ्रेंड असण्यापेक्षा धरणात बुडून मेलेलं बरं…

पण मरणाची भीती वाटते, त्यापेक्षा पिलेलं बरं!

 

लग्न झालं तेव्हा जणू अघटीतंच घडलं,

दारू पिण्यासाठी आयुष्यातलं

सगळ्यात मोठ्ठं कारण कळलं!

एक प्रश्न पडायचा,

एका हातात हेलमेट, दुसर्‍या हातात दळण

कान कुकरच्या तिसर्‍या शिट्‍टीवर, हेच का असतं ते मरण?

अशी बायको राहण्यापेक्षा माहेरी हाकलवून दिलेली बरी

पण कालच्या प्रोग्रॅमनंतर ठेवलेली बाटली शोधणार कोण?

त्यापेक्षा हिला घरीच झेललेली बरी

‘कशाला पिता एवढं तुम्ही’ – अशी सदा तिची कटकट असते

‘उद्यापासून सोडली दारू’ असेच आमचे वचन असते

तिच्या समाधानासाठी आता अखेरचा थेंब घ्यावा

पण जीवनातून मग आमच्या निघून जाईल ना ओलावा

म्हणून वाटायचं कधी कधी…

अशा कोरड्या आयुष्यापेक्षा,

सरणावरती पडलेलं बरं…

पण मरणाची भीती वाटते, त्यापेक्षा पिलेलं बरं!

 

वय झालंय आता खाण्यापेक्षा पथ्यच फार

पण अजूनही ग्लास पाहून गळ्यामधे लागे धार

घर आम्हाला कंटाळलंय कदाचित

म्हणून थोड्या चेंजसाठी वृद्धाश्रमात आलोय

सुनेलाही आराम म्हणून

जरा हुशार सासरा झालोय

मोठ्या मुलाने चुकून रॉन्ग नंबर लावलाच

तर तब्बल अडीच मिनीटं बोलणं होतं

लहाना परदेशाहून व्हीस्की पाठवतो,

त्यातनंच त्याचं प्रेम ते काय दिसतं!

आता कसं सांगू यांना –

की आयुष्याचा शेवटचा पेग भरतोय, निदान आतातरी साथ द्या

या अडगळीतल्या म्हातार्‍याला पैसे नको प्रेम द्या

म्हणून तर वाटतं…

हे लाचार जिणं जगण्यापेक्षा साध्या थंडीत कुडकुडून मेलेलं बरं…

पण काय करणार…

मरणाची भीती गेलीय हो कधीच..

आता फक्त आमच्या हिच्यासाठी जगायचंय,

त्यामुळे दिवस ढकलण्यासाठी पिलेलंच बरं…!!!

                        – प्रविण जव्हेरी

(१४/०१/२०१६, १५/०१/२०१६)

image credits: http://www.builtlean.com/2016/04/21/hidden-sugar-foods/

Click on his name to know more about Pravin Javheri.

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s