मी प्रेम शोधत आहे – by Harshal Pentewar

heart-1998001_1920

अमावस्येच्या रात्री मी चंद्र शोधत आहे,
दिसते जरी दूर ते क्षितिज शोधत आहे,
या भयाण काळोखात, गेलो मी वाट चुकून,
पण, या वाटेवरती मी तुझ्या पावलांचे ठसे शोधत आहे,
मी प्रेम शोधत आहे….
गेली ती रात्र भिजून तुझ्या विरहाच्या आसवाने,
कोमेजली ती फुले तुझ्या व्याकुळलेल्या श्वासाने,
पण मी ठेवली आहे जपून आपल्या भेटीची ती आठवण,
त्या आठवणीत मी तुझे नाव शोधत आहे
मी प्रेम शोधत आहे…
वेदना या जपून मी उरात ठेवत आहे,
हसरा हा तुझा चेहरा हृदयात ठेवत आहे,
आठवूनी तुला पुन्हा पुन्हा हा कंठ दाठतो माझा,
तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी हुंदक्यात शोधत आहे
मी प्रेम शोधत आहे….
अंगणातील रांगोळीत मी तुझा रंग शोधत आहे,
विस्कटलेल्या आयुष्यात माझ्या मी तुझी वाट शोधत आहे,
भेटू आपण नक्कीच पुन्हा पुढच्या जन्मी,
तोपर्यंत मी देवळात देव शोधत आहे
मी प्रेम शोधत आहे….

Know More About Harshal👇👇

Harshal

Image Credits:

pixabay

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s