College Life संपणार… – by Payal Kunjir

(काॅलेज सोडतांना मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या आठवणींचा ओसंडून वाहणारा प्रवाह… Farewell program च्या निमित्ताने सादर केली गेलेली एक सुंदर कविता…… )

ज्याची त्याची सुरू होती फक्त submission ची घाई..
आता college चे शेवटचे दिवस,
याचं कोणाला भानही राहिलं नाही….

मध्येच कोणीतरी बोललं,
झालं आता शेवटचं submission..
दोन minute स्तब्ध शांतता,
कारण संपणार होतं engineering नावाचं mission…

असं वाटलं वेळ थांबवता आली असती तर..
प्रत्येक क्षण rewind करुन जगता आला असता तर..
mech stairs वरच्या गप्पा पुन्हा मारता आल्या असत्या तर..
अन् lawn वरचा दंगा पुन्हा करता आला असता तर….

डोक्यात एक वेगळच काहूर उठलं होतं,
आयुष्यातून एक पर्व सुटलं होतं..
बघता बघता farewell चा दिवस आला,
पण अजूनही आठवतो college चा पहिला दिवस मला….
वाटल होत इथे आपल्यासारखं कोणी असणार का?
अन् या नवीन जगात आपला निभाव लागणार का?

पण नशिबाने इथे खूप सारे नमुने होते..
maturity म्हणजे नेमकं काय हे त्यांनाही ठऊक नव्हते….
कदाचित म्हणूनच आयुष्य सोपे होऊन गेले,
अन् उनाडपणा करण्यात चार वर्ष सरून गेले….

canteen चा चहा,
juice centre चे पोहे..
reading room मध्ये net,
mech stairs वरचे debate..
library चा fine,
student section ची line..
lawn वरचा दंगा,
classroom मधला पंगा..
workshop मध्ये project,
interview मधून reject..
करंडक celebration,
हजारो extra session..
sweet innocent crush,
submission वेळची rush..
नको वाटणारी midsem,
scoring साठी endsem..
न कळणार्या गोष्टी तोंडपाठ,
तरीही oral ला लागलेली वाट..

एक एक करून सारं काही आठवत होतं,
अन् पुन्हा हेच क्षण जगावे असं सारखं वाटत होतं..
आता सारं काही संपणार याची जाणीव होत होती,
आज अचानक उनाडपणाची उणीव होत होती..

casuals मधून formals मध्ये आता यावं लागणार,
इथून पुढचं प्रत्येक presentation मनापासून द्यावं लागणार..
खर्चाचं तारतम्य बाळगावं लागणार,
वेळेचं भान आता ठेवावं लागणार,
नको आसतानाही mature आता व्हावं लागणार,
life ला practically आता घ्यावं लागणार,
कारण आपलं college life संपणार,
आपलं college life संपणार…..

 

Image Credits: http://transitionofthoughts.com/2011/03/18/6-years-of-college-life-a-life-well-lived/

 

Click on her name to know more about Payal Kunjir.

Advertisements

अंधारयात्रा… – By Sarvesh Joshi

Dedicated to all those innocent women who fall prey to inhuman bullshit… I can’t understand the pain from which you’re suffering… But I can show my support to you… Here I’m standing by you…
एका काळोख्या रात्री, आडवळणावर,

चालले होते मी दबकतच…

धडधडत होती छाती, कापत होतं शरीर…

पण रस्ता मात्र संपत नव्हता..

न् मंदिराच्या चौकात दिसले ‘ते’ मला…

साध्या मानवी कातडीचे राक्षस…

सावरून घेतला मी झटकन पदर,

पण नाही पडला फरक त्यांना…

ते घेत होते आस्वाद माझ्या तारुण्याचा…

नुसत्या डोळ्यानेच…

अधाशीपणे…

जणू जनावरं बघतात भक्ष्याकडे..

अचानकच त्यातला एक आडवा आला मला…

माझा प्राण कंठाशी आला..

पण चालतच राहिली मी…

दुर्लक्ष करून…

भेदरलेल्या हरिणीसारखी…

कदाचित दुखावला गेला त्याचा पुरुषी अहंकार…

न् धावून आला तो माझ्यावर…

चवताळलेल्या नागसारखा..

तोंड दाबतच, मारहाण करीतच,

नेण्यात आलं मला टपरीमागे…

मी प्रतिकार करत होते,

हातपाय झाडत होते…

कसायाकडे गाय करते तशी…

पण तेदेखील कसाईच…

ढकलून दिलं त्यांनी त्यांच मार्दव माझ्यात…

पण सोडून दिलं मला खोल अंधारगर्तेत…

जीवघेणा आघात झाला माझ्या अस्तित्त्वावर…

लिलाव करण्यात आला माझ्या तारुण्याचा…

माझा कडेलोट करण्यात आला-

जगाच्या मानमर्यादेतून…

माझ्याच स्वत्त्वातून…

बळी घेण्यात आला माझ्या आत्मविश्वासाचा…

क्रूरतेने…

अमानुषपणे…

शेवटी फेकून देण्यात आलं मला फुटपाथवर…

नग्न अवस्थेतच…

बाहेरूनही न् आतूनही…

शून्य करून टाकलं गेलं मला…

माझ्याच विश्वातून परकं करण्यात आलं मला…

आनंदाचा सूर्य मावळला गेला कायमचा…

न् मी तिथेच

अंधारात चाचपडत,

फुटलेला आत्मविश्वास गोळा करत,

हरवलेली आशा शोधत,

न् अंधारयात्रा संपण्याची वाट बघत….

                                                                        -शाश्वत

image credits: https://in.pinterest.com/PepperJones120/away/?lp=true

Click on his name to know more about Sarvesh Joshi.

अपयशाकडून यशाकडे बघतांना… – By Dikshant Gajbhiye

जेव्हा मी अंधारकडून उजेडाकडे बघतो,
आशेची एक किरण नजरेस दिसते ।
मी हरलो जरी अनेकदा,
प्रयत्नांची आस कधी ना विरते ।।

अपयशामुळे ठेच लागते,
तरी खडबडून मी उठतो।
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर,
मी स्वतःला जिंकत पाहतो।।

प्रत्येकवेळी मदतीचा हात घेऊनि,
जवळ कोणी येत नसतो।
अशावेळी तुला खुद स्वतःचा,
एक आधारस्तंभ व्हावा लागतो।।

स्वतःवरचा आणि प्रयत्नांवरचा विश्वास,
कधीच ढासळू द्यायचा नसतात।
कारण याच गोष्टी जीवन घडविण्यास,
मदत करीत असतात।।

शेवटी एकच  म्हणतो की,
पराजित होऊन पण,
अजिंक्य मला वाटू लागतांना।
या अपयशाकडून यशाकडे,
उंच मानेने मी बघतांना।।

image credits: https://www.entrepreneur.com/article/239360

Click on his name to know more about Dikshant Gajbhiye.

जातीय सलोखा बिघडत चाललाय म्हणे… – By Anand Puri

गल्लीतल्या एका स्टॉलवर,
बसलेली असते ती,
बुरखा घालून…
तिच्या पुढ्यात असतात,
सगळ्या प्रकारची फुले,
ताजी आणि टवटवीत…
वेळप्रसंगी हारही करते ती,
प्रत्येक देवासाठी,
तुम्ही सांगाल तसा…
संकष्टी आणि एकादशीही,
माहिती असतात तिला,
अगदी तंतोतंत…
दुर्वा आणि मंजुळाही,
आणते ती त्या दिवशी,
न चुकता…
आम्हीही भक्तिभावाने,
अर्पण करतो ते सर्व,
देवाच्या पायाशी…
त्या फुलांनी कधी,
देव बाटल्याचं,
नाही ऐकलं मी…
पण हे रोज ऐकतोय,
जातीय सलोखा,
बिघडत चाललाय म्हणे…
image credits: https://www.scoopwhoop.com/inothernews/indian-childhood/#.3un9vm685
Click on his name to know more about Anand Puri.

त्यापेक्षा पिलेलं बरं… – by Pravin Javheri

माझ्या मते प्रेमात पडलेल्या मुलांच्या दोन जाती असतात. पहिली म्हणजे ज्यांना खरं प्रेम लाभलंय ती जात! ह्यात त्याला तर ती आवडतेच, पण तिलाही तो आवडतो!!… खरंवालं खरं प्रेम! ह्या जातीची लोकसंख्या तशी कमीच आहे. दुसरी जात म्हणजे माझ्यासारख्यांची. सगळं try करून भागलेली, पण काहीच नशिबी नसलेली. त्यामुळे आमच्यासारख्यांच्या कवितांमध्ये ‘प्रेयसीच्या गालावरल्या खळीपासून – दारूच्या मळीपर्यंतचा’ प्रवास दिसतो.

मी ह्या जातीला एक नाव दिलंय. LBC… Lovers Backward Class! असं असलं तरी, LBC ला कुठल्याही सुंदरीच्या ह्रदयात आरक्षण नाही ती गोष्ट वेगळी!

(खरंतर एक तिसरीही जात असते. ‘हा माझा experience नाही, मित्रांच्या अनुभवावरून लिहिले आहे’ म्हणणारी. पण ह्या सगळ्या निव्वळ अंधश्रद्धा असतात. मनात ह्यांच्याही असतेच एखादी crush, पण उगाच चारचौघात सांगायला लाजतात, म्हणून हा परानूभवाचा बहाणा.)

तर असा मी LBC जातीचा कवी माझी व्यथा मांडतोय.

‘फु बाई फु’च्या कुठल्याशा Grand Finale मधे दोन ओळी ऐकल्या होत्या, तेव्हा ही कविता सुचली. तर असा मी LBC जातीचा कवी माझी व्यथा मांडतोय.

 

त्यापेक्षा पिलेलं बरं…

 

दारू पिण्यापेक्षा मेलेलं बरं…

पण मरणाची भीती वाटते, त्यापेक्षा पिलेलं बरं!

 

कॉलेजमधे होतो तेव्हा तिच्यासोबत १०० प्लान्स्‌ बनायचे

पण त्यातल्या एखाद्याच्याच नशिबी होते सक्सेसफूल व्हायचे

उरले ९९…

ते उरलेले ९९ पूर्ण करायला मी मित्रांसोबत हॉस्टेलवरंच बसायचो

वॉर्डन कधी ओरडला नाही, कारण त्याला रसना म्हणून पाजायचो

एक प्रश्न पडायचा…

माझं तर ठीक आहे – मी ह्या ९९ वेळी मित्रांसोबत बसतो

पण त्यावेळी हीचा नेमका पत्ता कुठे असतो?

कुठूनतरी कळलं जेव्हा की,

असेच १०० प्लान्स्‌ हिचे इतर १०० ठिकाणी बनतात

आणि मग उरलेले नाईंटी नाईन कुठेतरी नाईंटी मारत बसतात

म्हणून वाटायचं,

अशी गर्लफ्रेंड असण्यापेक्षा धरणात बुडून मेलेलं बरं…

पण मरणाची भीती वाटते, त्यापेक्षा पिलेलं बरं!

 

लग्न झालं तेव्हा जणू अघटीतंच घडलं,

दारू पिण्यासाठी आयुष्यातलं

सगळ्यात मोठ्ठं कारण कळलं!

एक प्रश्न पडायचा,

एका हातात हेलमेट, दुसर्‍या हातात दळण

कान कुकरच्या तिसर्‍या शिट्‍टीवर, हेच का असतं ते मरण?

अशी बायको राहण्यापेक्षा माहेरी हाकलवून दिलेली बरी

पण कालच्या प्रोग्रॅमनंतर ठेवलेली बाटली शोधणार कोण?

त्यापेक्षा हिला घरीच झेललेली बरी

‘कशाला पिता एवढं तुम्ही’ – अशी सदा तिची कटकट असते

‘उद्यापासून सोडली दारू’ असेच आमचे वचन असते

तिच्या समाधानासाठी आता अखेरचा थेंब घ्यावा

पण जीवनातून मग आमच्या निघून जाईल ना ओलावा

म्हणून वाटायचं कधी कधी…

अशा कोरड्या आयुष्यापेक्षा,

सरणावरती पडलेलं बरं…

पण मरणाची भीती वाटते, त्यापेक्षा पिलेलं बरं!

 

वय झालंय आता खाण्यापेक्षा पथ्यच फार

पण अजूनही ग्लास पाहून गळ्यामधे लागे धार

घर आम्हाला कंटाळलंय कदाचित

म्हणून थोड्या चेंजसाठी वृद्धाश्रमात आलोय

सुनेलाही आराम म्हणून

जरा हुशार सासरा झालोय

मोठ्या मुलाने चुकून रॉन्ग नंबर लावलाच

तर तब्बल अडीच मिनीटं बोलणं होतं

लहाना परदेशाहून व्हीस्की पाठवतो,

त्यातनंच त्याचं प्रेम ते काय दिसतं!

आता कसं सांगू यांना –

की आयुष्याचा शेवटचा पेग भरतोय, निदान आतातरी साथ द्या

या अडगळीतल्या म्हातार्‍याला पैसे नको प्रेम द्या

म्हणून तर वाटतं…

हे लाचार जिणं जगण्यापेक्षा साध्या थंडीत कुडकुडून मेलेलं बरं…

पण काय करणार…

मरणाची भीती गेलीय हो कधीच..

आता फक्त आमच्या हिच्यासाठी जगायचंय,

त्यामुळे दिवस ढकलण्यासाठी पिलेलंच बरं…!!!

                        – प्रविण जव्हेरी

(१४/०१/२०१६, १५/०१/२०१६)

image credits: http://www.builtlean.com/2016/04/21/hidden-sugar-foods/

Click on his name to know more about Pravin Javheri.

 

आयुष्य: एक रंगमंच… – By Mahesh Khedkar

या रंगमंचावर न एंट्री आपल्या हातात न एक्झिट. आपल्या हातात फक्त दोहोंच्या मधील आपल्याला दिलेली

भूमिका. खरे तर भूमिका कशी सादर करावी, कुठलाही संवाद कसा निभवायचा हे सांगणारा सद्सद्विवेकरुपी

दिग्दर्शक आपणा सर्वांनाच लाभलेला असतो. पण होत काय की जसजसे नाटक रंगत जाते..आपण इतर

कलाकारांना तुच्छ समजायला लागतो. आपल्यात इतका अहमभाव निर्माण होतो कालान्तराने की आपण

स्वतःला नटसम्राट समजू लागतो. मग आपण दिग्दर्शकाला सुद्धा कवडीमोल समजू लागतो. म्हणजे भूमिका

अजून पूर्णपणे समजलेली पण नसते .. तरी आपल्या सर्वात जवळचा मित्र असणाऱ्या दिग्दर्शकरूपी

विवेकबुद्धीला आपण वैरी करून ठेवतो. आणि मित्रांच्या उणीवा भरून काढायला षड्रिपू तयारीतच असतात.

अशावेळी संसार तर सोडाच आपली भूमिका सुद्धा आपण विसरून रंगमंचाचा आणि ज्याने आपल्याला ह्या

भूमिकेसाठी निवडले त्याचा घोर अपमान करत असतो. कुणी कृष्णरूपी सखा सर्वांनाच नाही मिळत येथे.

 

image credits: https://www.pinterest.com/pin/486670303463229907/

Click on his name to know more about Mahesh Khedkar.

आठवणी… – By Anand Puri

रखरखत्या वाळवंटात निवडुंगाच्या पानांवर दवबिंदू साचल्यावर त्याला जे वाटतं नं,
अगदी तसंच तुझ्या आठवणींनी मला वाटतं…
तू नाहीयेस ह्याचं दुःख डोळ्यातून पाझरण्याची वाटच बघत असतं जणू…
त्याला थोपवण्यासाठी रेडिओ ऑन केला,तर तिथेही काहीतरी काळजाला भिडणारंच चालू असतं…
ते सूर नकळतच मनावर घाव घालतात,
आणि मग भळभळून वाहते तुझी प्रत्येक आठवण…
एवढं होऊनही रेडिओ बंद करण्याचं धाडस मी नाही करू शकत…
ह्या जखमांमधून मिळणारं समाधानच मला जिवंत ठेवत असावं कदाचित…
पण असो…
तुझ्यासारख्याच तुझ्या आठवणीही आहेत…
येतात तेव्हा सगळं काही भरभरून देतात…
image credits: http://www.thegrovecog.com/2015/11/10/memories/
Click on his name to know more about Anand Puri.